ग्रामपंचायत सुंदरपूर ता निफाड जि नाशिक
सुंदरपूर हे एक ऐतिहासिक गाव आहे, जिथे शैक्षणिक आणि सामाजिक सुविधा उपलब्ध आहेत.




”सरपंच
ग्रामपंचायत अधिकारी






प्रशासकीय संरचना






विस्तार अधिकारी ग्रा पं
मा गटविकास अधिकारी वर्ग १
पंचायत समिती निफाड
ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सुंदरपूर ता निफाड जि नाशिक
ग्राम विकास
सुंदरपूर ग्रामपंचायतीच्या विकासात्मक योजनांची माहिती.
शिक्षण सुविधा
गावात प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी केंद्रे उपलब्ध आहेत.
कृषी उत्पादन
गावातील मुख्य व्यवसाय म्हणजे शेती, ऊस आणि द्राक्षांची लागवड.
शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देणारी पिके.
सामाजिक सुविधा
गाव
सुंदरपूर: एक ऐतिहासिक गावाची ओळख
गावाविषयी माहिती
सुंदरपूर हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कादवा व गोदावरी नदीच्या कुशीत वसलेल एक ऐतिहासिक असे गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ९६५ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्रे १ अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, सोयाबीन व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. ऊस या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
सुंदरपूर ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गतभरपूर घरांना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सुंदरपूर गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ०७ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
सुंदरपूर गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श विकसनशील व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते .
भौगोलिक स्थान
सुंदरपूर हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ४ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ २६९.३ चौ.कि.मी. असून ग्रामपंचायतीमध्ये ०३ वार्ड आहेत. एकूण २१५ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ९६५ आहे. त्यामध्ये ४७५ पुरुष व ४९० महिला यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८० से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १०० से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.
सुंदरपूर गाव द्राक्ष,सोयाबीन ,मका व ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.
लोकजीवन
सुंदरपूर गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्येही कार्यरत आहेत.गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात
वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूर्जाना विशेष महत्त्व आहे.येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
सुंदरपूर लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात
लोकसंख्या पुरुष ४७५ स्रिया ४९० एकूण ९६५
संस्कृती व परंपरा
सुंदरपूर गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व साप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी पांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुले, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत पोगदान देतात. सुंदरपूर गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे
प्रेक्षणीय स्थळे
ग्रामदैवताचे मंदिर गावातील प्रमुख देवतेचे मंदिर हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी साप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
कादवा नदीच्या तीरावरती आकर्षक असे सोमेश्वर महादेव मंदिर असून दर वर्षी शिवरात्री निमित्ताने भाविकांची मोठ्या प्रमाणवर दर्शनसाठी गर्दी असते .
हनुमान मंदिर गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.
जुने गावठाण येथे आंबट चिंचेचा मळा असून गावातील जुन्या आठवणीला हे स्थान लोकप्रिय बनवते
जवळची गावे
सुंदरपूर गाव निफाड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे सुंदरपूर शी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत
निफाड, कोठुरे, जळगाव, काथरगाव , कुरुड्गाव , पिंपळस, रसलपूर ही सुंदरपूर च्या आसपासची प्रमुख गावे आहेत.
ग्रामपंचाय प्रशासन
सौ .प्रतीक्षा विजय सोमवंशी सरपंच ९३७००२०१३३
श्री .अशोक दत्तू सोनवणे उपसरपंच ९९७५९९९१५
श्री .गुलाब दगू पवार सदस्य ८४५९५७०८५४
सौ .लंकाबाई वाळीबा गवळी सदस्या ८९७५४४२४३७
सौ .आशाबाई नानासाहेब सोमवंशी सदस्या ९८२२३०७०५९
श्री .लहानू गुलाब साळवे सदस्य ८४८४८३००३३
सौ .जस्मिन हिजरत शेख सदस्या ९८६०९०८७८०
ग्रामपंचायत इतर विभाग कर्मचारी
श्री .विष्णू विनायक सालमुठे ग्रामपंचायत अधिकारी ८९९९२५६८०४
श्री .अनिल गुलाब पवार पाणीपुरवठा कर्मचारी ८८३०९२२९६७
श्री .अजय कृष्णा साळवे संगणक परिचालक ९३५६७८४२००
महसूल इतर विभाग कर्मचारी
सौ .तन्वी कणसे ग्राम महसूल अधिकारी ९९२०८३३५९३
सौ .अस्मा शेरू खान BLO ९८९०१६३२१८
श्री .दिपक भास्कर साळवे पोलीस पाटील ९५७९५४४५२२
श्री .योगेश पाटील सहय्यक कृषी अधिकारी ८०८७६७४५४७
ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखले
जन्म नोंद दाखला
मृत्यु नोंद दाखला
विवाह नोंदणी दाखला
दारिद्य रेषेखालील असल्याचा दाखला
ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
निराधार असल्याचा दाखला
नमुना ८ चा उतारा
उत्पन्न दाखला
जातीचा दाखला
.
शिक्षण विभाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुंदरपूरयुडायस नंबर :-27201011701
इयत्ता मुले मुली एकूण
पहिली ४ ५ ९
दुसरी ४ ५ ९
तिसरी ४ ८ १२
चौथी ७ ६ १३
एकूण १९ २५ ४३
शिक्षक माहिती
श्री.मोहनलाल जयप्रकाश भावसा मुख्याधापक ८६९८६६७६६६
सौ .योगिता भास्कर भावसार शिक्षक ९४०५४८०६७९
अंगणवाडी विभाग
अंगणवाडी मुले मुली माहिती अंगणवाडी कोड :- 27516160327
अंगणवाडी नाव मुले मुली एकूण
अंगणवाडी १२ १५ २७
अंगणवाडी सेविका माहिती
सौ .भारती अशोक साळवे अंगणवाडी सेविका ८४५९८७६९८१
सौ . सरला लहानू सोमवंशी मदतनीस ९७६७९०५७३२
आरोग्य विभाग
डॉ .सुजित कोशिरे तालुका वैद्यकीय अधिकारी ९४२२७५७५६५
डॉ .विशाखा शिंदे PHC वैद्यकीय अधिकारी ९१३०५४३६४७
डॉ .पूजा कापसे उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी ९४२०२५९५४२
सौ .दिपाली वानखेडे आरोग्य सेविका ८०८०७८१३६८
श्री .संकल्प वाघ आरोग्य सेवक ९५५२९३६०७२
सौ .अस्मा शेरू खान आशा वर्कर ९८९०१६३२१८
स्त्री स्वयं सहाय्यता ग
भरारी महिला ग्रामसंघ
१वैष्णवी महिला स्वयंसहायता समुह सुंदरपूर
२कादवा महिला स्वयंसहायता समूह सुंदरपूर
३ रेणुका महिला स्वयंसहायता समूह सुंदरपूर
४ राधाकृष्ण महिला स्वयंसहायता समूहसुंदरपूर
५नवदुर्गा महिला स्वयंसहायता समूह सुंदरपूर
६रमाई महिला स्वयंसहायता समूहसुंदरपूर
७अहिल्याबाई महिला स्वयंसहायता समूह सुंदरपूर
८ साई महिला स्वयंसहायता समूह सुंदरपूर
९प्रगती महिला स्वयंसहायता समूह सुंदरपूर
१० माऊली महिला स्वयंसहायता समूह सुंदरपूर
११ मातोश्री महिला स्वयंसहायता समूह सुंदरपूर
१२ कुलस्वामिनी महिला स्वयंसहायता समूह सुंदरपूर
१३रेणुका महिला स्वयंसहायता समूह सुंदरपूर
१४ सर्वज्ञ महिला स्वयंसहायता समूह सुंदरपूर
१५ शिवकन्या महिला स्वयंसहायता समूह सुंदरपूर
१६ पंचदीप स्वयंसहायता समूह (दिव्यांग ) सुंदरपूर
संपर्क साधा
आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा.